उच्चशिक्षित सुधीर अप्पा सराफ हिंगोली विधानसभेच्या मैदानात

 उच्चशिक्षित सुधीर अप्पा सराफ हिंगोली विधानसभेच्या मैदानात 
 
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
26जून2024
हिंगोली - हिंगोली विधानसभेची  निवडणुक लढविण्यासाठी   सुधीर अप्पा सराफ यांनी आतापासून कंबर कसली असून ठिकठिकाणी भिंतीवर स्लोगन लिहीत तयारी सुरू केली आहे.  विशेष म्हणजे सुधीर अप्पा हे उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी तयारी सुरू केली आहे.
सुधीर अप्पा सराफ यांचे आजोबा नागनाथ अप्पा आणि वडील वैजनाथ अप्पा हे देखील मुरब्बी राजकारणी होते त्यांनी पालिकेचे नगराध्यक्ष पद देखील भूषविले होते. त्यानुसार सुधीर अप्पा सराफ देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरले. घरात पिढ्या न पिढ्या चालत आलेले राजकारण हे सुधीर सराफ यांना नवे नाही. घरातच राजकीय बाळकडू मिळाल्याने त्यांनी देखील नगरसेवक ते नगराध्यक्ष पद भूषविले . सुधीर अप्पा सराफ यांनी वैजनाथ अप्पा नागरी सहकारी बँकेच्या व सराफा व्यवसायिक म्हणून आपली ओळख हिंगोली विधानसभा नसून जिल्ह्यात निर्माण केली आहे. त्यांच्या वडिलांनी जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन उभारून काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचे काम त्यांच्या कुटुंबांनी केले आहे. आता सुरेश  अप्पा सराफ देखील प्रदेश काँग्रेस कमिटीचे विभागीय उपाध्यक्ष आहेत. याशिवाय जिल्हा टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष असून , सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत .त्यामुळे त्याची हिंगोली विधानसभा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. यावेळी काँग्रेस पक्ष सुधीर सराफ यांच्या सारख्या नवख्या तरुण तडफदारास उमेदवार म्हणून संधी दिल्यास नक्कीच हिंगोली विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवतील अशी आशा नवं मतदार तरुणांना आहे.
दरम्यान, सुधीर अप्पा सराफ यांच्यात संघटन कौशल्य निर्माण करण्याची क्षमता असून त्यांनी आतापर्यंत हिंगोली विधानसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. ठिकठिकाणी भिंतीवर स्लोगन लिहीत तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षात इच्छुक डझनभर असतील मात्र सुधीर अप्पा सराफ यांच्या सारखा जनसंपर्क कोणत्याही इच्छुकांत पाहायला मिळत नाही. सुधीर अप्पा यांचे मोठे बंधू सुरेश अप्पा सराफ यांच्याही जनसंपर्काचा फायदा नक्कीच सुरेश अप्पा सराफ यांना मिळणार हेही तेवढेच खरे आहे. 
हिंगोली विधासभा हा आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. माजी आमदार साहेबराव पाटील ,  माजी आमदार भाऊराव पाटील सलग तीन वेळा काँग्रेस पक्षाकडून निवडणून आले. याला अपवाद केवळ भाजपचे बळीराम पाटील कोटकर दोन वेळेस निवडून आले तर आमदार तानाजी मुटकुळे हे दोन वेळा भाजप कडून निवडणून आले. आता भाजपचे तानाजी मुटकुळे आमदार आहेत .हे चार टर्म वगळता इतर वेळी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने