गौशाळेची अपील फेटाळून मा. जिल्हा न्यायालय यांनी 42 जनावरे मूळ मालकांना देण्याचा आदेश कायम
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
17जुलै2024
घटनेची सविस्तर माहिती असी की
दि 7/मे/2024 रोजी शहर पोलीस स्टेशन, हिंगोली यांनी पेन्शन पुरा, हिंगोली भागात अनेक व्यक्तीच्या घरा समोर बांधलेले 42 जनावरे कत्तली साठी ठेवल्याचे संशय वरून जप्त केले होते.
दि 15/जुलै/2024 रोजी जनावर मालकांवर गुन्ह क्र 176/2024 पशु हिंसाचार च्या विविध कलमे अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला
दुसऱ्या दिवशी मूळ मालकांचे कागद पत्रे तपासून सुद्धा 42 जनावरे ,। संत जनाबाई गौशाला, वैजापूर हिंगोली याना सुपूर्द केले,
त्या नाराजीने जनावरे मालकांनी हिंगोली न्यायालय, प्रथम श्रेणी येथे जनावरे मिळण्या साठी ऍड अजय उर्फ बंटी पंडितराव देशमुख, यांच्या मार्फत अर्ज केला व तो अर्ज मंजूर होऊन न्यायालयानि जनावरे मूळ मालकांना परत देण्याचा आदेश पोलीस स्टेशन शहर यांना देण्यात आला.
त्या नंतर संत जनाबाई गौशाला यांनी मा. जिल्हा न्यायालय, हिंगोली येथे अपील केले होते, ती सुद्धा अपील मा जिल्हा न्यायालय येतील जिल्हा न्यायाधीश मा. श्री लोखंडे साहेब, यांनी दि 16/7/2024 रोजी गौशाळेची अपील फेटाळून 42 जनावरे मूळ मालकांना देणायचा आदेश कायम ठेवला....
जनावरे मालकांच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली ॲड.अजय बंटी देशमुख, यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख, ऍड अविनाश राठोड, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी पाटील, ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे, ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,अँड तुषार पवार,ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा