असोला येथील गोळीबारप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

असोला येथील गोळीबारप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
20जुलै 2024
 हिंगोली जवळा बाजार: औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील गोळीबार प्रकरणात पाच जणांविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात १९ जुलै रोजी गुन्हा नोंद झाला, पोलिसांनी यात एकास ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी नागोराव अशोक पावडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ जुलै रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ग्रा.पं. कार्यालयाजवळ नागोराव यांनी बालाजी यास काही दिवसांपासून शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली. या कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी मारोती विश्वनाथ पावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर बालाजी याने गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना साक्षीदाराने उचलून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता विशाल रमेश नागरे याने फिर्यादीस चाकूने वार केला, तर अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जिल्ह्यात पावसामुळे असे हिरवेगार माळरान दिसत आहेत सुनील पाठक यांनी घेतलेले छायाचित्र 

दुसऱ्या गटांकडूनही तक्रार
जवळाबाजार : याच प्रकरणात दुसऱ्या गटाकडूनही तक्रार दिली आहे. या
प्रकरणी रमेश रुस्तुमराव नागरे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा काशिनाथ ढोबळे, नागेश तावडे, काशिनाथ ढोबळे, शिवा पडघन, नागेश केशव ढोबळे व अन्य सात ते बारा जणांविरूद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील आरोपींनी घरात घुसून तुझा मुलगा कोठे आहे, असे विचारून रमेश नागरे यांना कृष्णा डोबळे याने लोखंडी रॉडने मारहाण केली. इतरांनी रमेश व साक्षीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण करून घरातील एसी, दुचाकीची तोडफोड केली. दोन ट्रॅक्टर जाळून नुकसान केले. तसेच घरातील कपाट उघडून रोख २ लाख २५ हजार रूपये, १० हजारांचे सोन्याचे दागिणे चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे तपास करीत आहेत.
असोला गावात पोलिस बंदोबस्त
• जवळा बाजार : असोला येथे गोळीबाराची घटना घडल्यानंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह इतर पोलिस बंदोबस्त गावात तैनात केला आहे.

■ शुक्रवारी अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, वसमतचे पोलिस उपविभागीय अधिकारी मारुती थोरात, हट्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन बोराटे व इतर पोलिसांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

याप्रकरणी नागोराव अशोक पावडे यांच्या फिर्यादीवरून बालाजी रमेश नागरे, विशाल रमेश नागरे, रमेश रुस्तुम नागरे, प्रमोद बंडू नागरे, अमोल पंढरीनाथ नागरे (सर्व रा. असोलातर्फे

औंढा ना.) यांच्याविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने