हिंगोली नगरपालिकेला मिळाल्या दोन अग्निशमन बुलेट

हिंगोली नगरपालिकेला मिळाल्या दोन अग्निशमन बुलेट

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
20जुलै2024
हिंगोली : आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हिंगोली नगरपालिकेला दोन अद्ययावत अग्निशमन बुलेट (फायर रिस्पॉडर बाईक) मिळाल्या आहेत. त्यामुळे आता दुर्गम भागात लागलेल्या आगींवरही वेळेत नियंत्रण मिळवता येणार आहे.

येथील नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात अग्निशमन बंब उपलब्ध आहेत. मात्र दुर्गम व वर्दळीच्या ठिकाणी लागणाऱ्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने शासनाकडून २ अग्निशमन बुलेट
पालिकेला मिळाल्या आहेत. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते फीत कापून या बुलेटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, शाम माळवटकर, अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, अभियंता प्रतीक नाईक, किशोर काकडे, वसंत पुतळे, राजेश पदमने, स्नेहल आवटे, आनंद दायमा, विनय साहू, संजय दोडल, किशोर खंडेलवाल, उत्तम जाधव, विजय रामेश्वरे, संदीप घुगे, अशोक गवळे, देवीसिंग ठाकूर, पंडित मस्के, नागेश नरवाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने