कर्नाटक राज्यातून येणारा 28 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा व मुद्देमाल प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर

कर्नाटक राज्यातून येणारा 28 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा व मुद्देमाल प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर
      महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
21 जुलै 2024  
      सविस्तर माहिती अशी की कळमनुरी पोलीसाच्या माहिती नुसार,
 कळमनुरी ते आखाडा बाळापूर महामार्गावर कळमनुरी पासुन काही अंतरावर पोलिसांनी बुधवारी दिनांक १७ जुलै  सकाळी ११ वाजता गुप्त माहीती आधारे तपासणी केलेल्या आयशर टेम्पो मध्ये ४५ पोते गुटखा आढळून आला आहे. सदर गुटखा कर्नाटकमधून आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सण, उत्सव असल्यामुळे सर्व पोलिस अधिकार व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कळमनुरी पोलिसांनी गावात तसेच मुख्य मार्गावर बंदोबस्त ठेवला होता.
        कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरून एका आयशर टेम्पोतून गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवंते, उपनिरीक्षक सतीष ठेंगे,  जमादार दादा साहेब  कांबळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, कैलास सातव यांच्या पथकाने सकाळी आकरा वाजता वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी कळमनुरी च्या जवळ आलेल्या एका आयशर टेम्पोला थांबविल्या नंतर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पक्का संशय असल्याने पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोते आढळून आली.
पोलिसांनी सदर टेम्पो क्रमांक kA- 4-A -4122 कळमनुरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली असता त्यात वजीर गुटख्याचे 45 पोते आढळून आले आहे. या पोत्यांची किंमत 21 लाख60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गटख्याची पोते व वाहन आयशर असे 28 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी चालकाची प्राथमिक चौकशीत केली असता त्याने कर्नाटक राज्यातील बिदर येथून गुटखा भरून नेण्याची सांगण्यात आले होते. मात्र नेमके गुटखा कोठे द्यायचा याची माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून बिदरमधील व्यक्तीची माहिती घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. 
     अशा आरोपावरून कळमनुरी पोलीस स्टेशन गुन्हा क्र 373/2024 कलम 123, 274, 275, 223, 3(5) , भा.न्या. सं 2023, , 26(2) व इतर अन्न सुरक्षा अदिनीयम अनव्य गुन्हा दाखल झाला होता,
     सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान प्रथम न्या. कळमनुरी न्यायालय यांच्याकडे ॲड.अजय उर्फ बंटी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड तुषार पवार यांनी जामीन अर्ज दाखल केले होता. 
मा.न्यायाधिश कळमनुरी मॅडम, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दिनांक  18/7/2024 रोजी आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख  ॲड.अजय बंटी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड तुषार पवार, यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी पाटील, ऍड अविनाश राठोड, ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे, ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,,ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने