आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मिलिंद मोरे यांचे अपघाती दुःखद निधन



आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मिलिंद मोरे यांचे अपघाती दुःखद निधन

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
22जुलै2024
महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंञी खा.चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचे  समर्थक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते भीमशक्ती चे मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंदभाऊ मोरे (65) यांचा दिं.22 जुन रोजी राञी 9 वा. नर्सि टि पांईट येथे अज्ञात वाहनाने अपघात झाल्यानंतर अधिक उपचारा करिता नांदेड येथील मेंदु विकार तज्ञ डाॅ.ऋतुराज जाधव यांचे यशोसाई हाॅस्पीटल येथे उपचार घेत असता प्रकृती अधिक खालावल्यामुळे मुबंई येथील लिलावती हाॅस्पीटल येथे उपचारा दरम्यान आज रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.
मृत्यु पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना, चार नातवंड, तीन भाऊ, दोन भावजई असा मोठा परिवार आहे.
अंत्यसंस्कार उद्या दिं.23 रोजी शहरातील आदर्श काॅलेज जवळील, पावर हाऊस शेजारील स्मशानभूमी येथे करण्यात येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने