आसोला गोळीबार प्रकरणातील क्रॉस फिर्यादीमधील आरोपींना अटकपुर्व जामीन मंजुर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 जुलै 2024
हिंगोली जिल्ह्यातील
असोला येथील गोळीबार प्रकरणानंतर दाखल झालेल्या क्रॉस फिर्यादीमधील सर्व आरोपींना वसमत अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी तात्काळ अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दि.१८ जुलै २०२४ रोजी मौजे आसोला ढोबळे येथे सामाजिक वादातून झालेल्या मराठा समाजाचे मारोती पावडे यांचेवर गोळीबारानंतर पीडित कुटुंबीय आणि गावातील बर्याच लोकांवर दंगल जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान, तसेच घरातून कपाटातील नगदी पैसे आणि अंगावरील दागिने चोरल्या बाबतची तक्रार गोळीबार करणार्या आरोपीच्या वडिलांनी, जे स्वतः सहआरोपी होते त्यांनी दिली होती. सदरील क्रॉस फिर्यादीमुळे हिंगोली येथील सकल मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे तसेच सदरील गुन्हे रद्द करण्याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक नांदेड यांना सर्वपक्षीय नेत्यांनी आणि आंदोलकांनी निवेदन दिलेले आहे.
दंगल, जाळपोळ, गंभीर मारहाण आणि चोरी सदृश्य दाखल झालेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपी त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसमत यांच्याकडे अटकपूर्व जामीन अर्ज ऍड.बाळासाहेब मगर पाटील यांचे मार्फत दाखल केले होते. सदरील प्रकरणी ऍड.बाळासाहेब मगर पाटील यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, आरोपीताविरुद्ध खोटी क्रॉस कंप्लेंट रंगवून दाखल केलेली आहे आणि बर्याचशा तथ्यास विसंगत आहे. तेव्हा न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरिम जामीन देण्याचे आदेशित केले. सदरील प्रकरणी ऍड.बाळासाहेब मगर पाटील यांना ऍड.अखिल नदाफ, आणि ऍड.शिवाजी गारकर यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा