सर्व समाजाला सोबत घेऊन पक्षाचे काम करीन डॉक्टर रमेश मस्के( नाईक)
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
२६ जुलै 2024
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील हटकर समाजाचे नेते डॉ.रमेश मस्के(नाईक) यांनी मातोश्री येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला
याप्रसंगी शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत,शिवसेना नेते श्री.विनायक राऊत नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात.माजी आमदार डॉ.संतोष टारफे जिल्हाप्रमुख श्री.गोपू पाटील,श्री.संदेश देशमुख, जिल्हासंघटक श्री.बाळासाहेब देशमुख. यांची उपस्थिती होती
मी मागील वीस वर्षापासून हिंगोली जिल्ह्यातील रुग्णाची सेवा करत
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे मी पुन्हा आज मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे हस्ते शिवबंधन धागा बांधून घेतला
कळमनुरी मतदारसंघात सर्व समाजाविषयी आपुलकी असून मी वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे
सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होतो
असे डॉ. रमेश मस्के( नाईक )यांनी महाराष्ट्र24 न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा