प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. रमेश मस्के नाईक यांचा शिवसेनेत प्रवेश..
हिंगोली- प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 जुलै 2024
जिल्ह्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी आज मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश घेतला. डॉ. मस्के यांच्या या प्रवेशामुळे मोठी राजकीय कलाटणी मिळाली असून येणाऱ्या काळात यातून नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात.
1990 पासून शिवसेनेशी डॉक्टर रमेश मस्के यांचे कुटुंब जोडले गेलेले आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर कळमनुरीत निर्णायक असणाऱ्या व बहुतांश शिवसेनेशी निगडित असलेल्या हटकर समाजातून ते येत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाकडे सर्वच राजकीय धुरीणींचे लक्ष लागले आहे. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर रमेश मस्के हे सर्व दूर परिचित आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांची सेवा केली आहे. मागील १८_२० वर्षापासून नाईक हॉस्पिटल हिंगोली व अभिनव सेवा संस्था यांचे निमित्ताने त्यांची अविरत सेवा चालू आहे एवढेच नव्हे तर अनेक गरजू तरुणांना देखील त्यांनी व्यवसायात हातभार लावलेला आहे. शिवाय शिवसेनेच्या जुन्या सैनिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत झालेला प्रवेश हा नवीन राजकीय समीकरणे घडविणारा ठरू शकतो. त्यांचा असलेला जनसंपर्क आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप यामुळे आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून ते कळमनुरी विधानसभेसाठी प्रबळ दावेदार देखील ठरू शकतात.
त्यांच्या आजच्या प्रवेशाच्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विनायकराव राऊत, नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार संतोष टार्फे, जिल्हाप्रमुख गोपु पाटील, संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा