वादग्रस्त जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित

 वादग्रस्त  जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
17जुलै 2024
नवी दिल्लीः वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित ठेवण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांना २३ जुलैपूर्वी मसुरी अकादमीत परत येण्यास सांगितले आहे नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र खोटे केल्याप्रकरणी खेडकर यांच्यावर आरोप आहे.

नितीन गद्रे, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या पत्रात असे लिहिले आहे की, 'लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसुरी यांनी एका पत्रात म्हटले आहे की पूजा दिलीप खेडकरचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी त्वरित परत बोलावले आहे.'
लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) च्या १६ जुलैच्या अधिकृत सूचनेनुसार, पूजा खेडकर यांना महाराष्ट्रातील प्रशिक्षण कर्तव्यातून मुक्त करण्यात आले आहे.

मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्याचे निर्देश
 त्यांना २३ जुलैपूर्वी मसुरी अकादमीत परत येण्यास सांगितले आहे. खेडकरांच्या नागरी सेवेत निवडीवरून वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. सेवेत स्थान मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मामासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने