डिग्रस क.खून प्रकरणी आरोपीस तीन दिवसांची कोठडी
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
27 ऑगस्ट 2024
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कन्हाळे येथील २४ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीस पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर उभे हजर केले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
डिग्रस कन्हाळे येथील माधव बाबुराव गोरे (वय २६) या तरुणाचा खून करून मृतदेह त्याच्या घरासमोरील ओट्यावर आणून ठेवला होता. ही घटना २२ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पथकाला दिल्या होत्या. त्यावरून पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. या घटनेतील आरोपी मयताच्या घराशेजारील लक्ष्मण रामेश्वर कन्हाळे
(रा. डिग्रस कन्हाळे) हा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मण कऱ्हाळे यास ताब्यात घेतले. सोमवारी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघड केला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठुबोने, घुले, संतोष वाठोरे, असलम गारवे, सुधीर ढेबरे, राजकुमार जमधाडे, प्रदिप राठोड, विजेश चव्हाण आदींच्या पथकाने
केली
टिप्पणी पोस्ट करा