उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
27 ऑगस्ट 2024
हिंगोली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार, दि. 28 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने प्रयाण करुन सायं. 5.00 वाजता गिरगाव फाटा, नांदेड वसमत रोड, वसमत जि. हिंगोली येथे आगमन करुन स्वागत रॅलीला सुरुवात करतील. नंतर मोटारीने प्रयाण करुन 5.40 वाजता मयूर मंगल कार्यालय, पूर्णा सहकारी साखर कारखाना रोड, वसमत जि. हिंगोली येथे आयोजित जनसन्मान यात्रा-शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. नंतर मोटारीने प्रयाण करुन सायं. 7.00 वाजता शमीम सिद्दीकी यांचे निवासस्थान, कारखाना रोड, वसमत जि.हिंगोली येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण करुन रात्री 8.10 वाजता आ.श्री. राजू नवघरे यांचे निवासस्थान, शास्त्रीनगर, वसमत जि.हिंगोली येथे आगमन करुन भाजप व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. नंतर मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
टिप्पणी पोस्ट करा