गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा
मुलींचे खासगी क्षण टिपले, हादरवणारे १०० व्हिडिओ
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
31 ऑगस्ट 2024
हैदराबादः मुलीच्या हॉस्टेल वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे सापडल्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींनी वसतिगृहातील स्वच्छता गृहात छुपे कॅमेरे आढळले. जवळपास शंभर व्हिडिओ लीक झाले असून त्यांची ऑनलाइन विक्री झाल्याचाही दावा केला जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनींनी
हॉस्टेल परिसरातच मध्यरात्री आंदोलन केले.
बीटेकच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने अन्य विद्यार्थ्याच्या मदतीने छुप्या कॅमेऱ्यांनी टिपलेले मुलींच्या खासगी क्षणांचे शेकडो व्हिडिओ विकले असल्याच्या आरोप आहे.
हा प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली आणि घाबरलेल्या विद्यार्थिनी आंदोलनासाठी कॅम्प्समध्ये उतरल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. एका विद्यार्थ्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
कसा उघडकीस आला प्रकार?
गुरुवारी संध्याकाळी विद्यार्थिनींच्या एका ग्रुपला त्यांच्या वॉशरूममध्ये लपवलेला कॅमेरा सापडला. हा कॅमेरा पाहताच विद्यार्थिनी आरडाओरडा करत बाहेर आल्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरल्या होत्या
टिप्पणी पोस्ट करा