श्रीकृष्ण कोकाटे हिंगोलीचे नवे पोलीस अधीक्षक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
14 ऑगस्ट 2024
हिंगोली : पोलिस दलातील पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले असून, त्यात हिंगोली जिल्ह्यासाठी पोलिस अधीक्षक म्हणून श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोलीचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची मागील आठवड्यात पुणे येथे बदली झाली. त्यानंतर हिंगोलीचे पोलिस अधीक्षक पद रिक्त होते. जिल्ह्यासाठी नवीन पोलिस अधीक्षक कोण येणार, याची उत्सुकता लागली होती.
१३ ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना हिंगोली येथे पोलिस अधीक्षक पदावर बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे.
श्रीकृष्ण कोकाटे हे यापूर्वी नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते. नांदेड येथीलच अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रीकृष्ण कोकाटे हे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. त्यांची आता हिंगोली येथे नियुक्ती झाली आहे. नांदेड येथील कार्यकाळात श्रीकृष्ण कोकाटे यांनी उल्लेखनीय काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोगही तेथे केले होते. त्यामुळे हिंगोली येथेही त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा