गावच्या दोन लेकींचा गावाकऱ्यांनी डीजे वर मिरवणूक काढून केला सन्मान
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
03 ऑगस्ट 2024
हिंगोली - आजेगाव : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवाशी असलेल्या कु.पूजा रविप्रसाद अवस्थी व कु. पल्लवी पंजाब वाघ ह्या दोघीनी हलकीच्या परिस्थितीत या पोलीस भरती मध्ये उत्तीर्ण होऊन गावाकऱ्यांचा व आई वडिलांच स्वप्न पूर्ण केलंय.या दोन लेकींचा गावाकऱ्यांनी डीजे वर मिरवणूक काढून सन्मान केलाय.ही मिरवून गावभर काढून जिल्हा परिषद शाळेत ह्या मुलाईंचा गावाकऱ्यांनी व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या मिरवणुकीतून इतर मुलींना व मुलांना प्रेरणा मिळावी हा या मागचा उद्देश आहे.विदर्भ व सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी लोणार येथे ह्या मुलींनी पोलीस भरतीची पूर्व तैयेरी केली होती.पुजा आणी पल्लवी यांच्या सोबत एकूण इतर 11 मुलींची निवड पोलीस भरती मध्ये झालीय...पल्लवी वाघ हिची वाशीम येथे निवड झाली तर पुजा वाघ हिची मुंबई येथील मिरभाईंदर येथे निवड .दरम्यान आज काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा