हिंगोलीत काँग्रेस कमिटीचा रविवारी महा मेळावा
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
03 ऑगस्ट 2024
माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांची माहिती
हिंगोली - आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि पक्ष बांधणीसाठी हिंगोली येथे रविवारी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांनी दिली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीला प्रचंड मतदान झाल्याने महाविकास आघडीचे उमेदवार निवडून आले आहेत. यामधे राज्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावेळी काँग्रेस खासदारांचे संख्याबळ वाढल्याने हौसला वाढला आहे. आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात मेळावे घेतले जात आहेत. हिंगोली विधानसभा हा काँगेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पुन्हा पूर्व वैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसला संधी आली आहे. त्या संधीचे सोने कसे करता येईल याकडे कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राज्याचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार रविवारी दी.४ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हा प्रभारी ऍड. सचिन नाईक. , जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्या मार्गद्शनाखाली हिंगोली येथील मधुरदीप पॅलेस येथे सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास जिल्हयातील माजी आमदार , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नगर पालिकेचे माजी सदस्य, पंचायात समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य , काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हा काँगेस कमिटीचे पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी , याशिवाय तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ ९४ विधानसभा हिंगोली यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा