सुधीर अप्पा सराफ यांच्या पाहणीची दखल घेत काँग्रेसचे वरीष्ठ नेते हिंगोलीत दाखल

सुधीर अप्पा सराफ यांच्या पाहणीची दखल घेत काँग्रेसचे वरीष्ठ नेते हिंगोलीत दाखल 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
4 सप्टेंबर 2024
हिंगोली -  हिंगोली येथील माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांनी हिंगोली विधानसभेतील पूर परिस्थितीचा सोमवारी जाग्यावर जाऊन आढावा घेतला , त्यामूळे काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सराफ यांच्या कामाची दखल घेत काँग्रेसचे वरीष्ठ नेते हिंगोलीत दाखल होऊन पूरग्रस्तांना भेटी देत नुकसाभरपाईसाठी शासनाला धारेवर धरत आहेत.
आमदार अमित भैया देशमुख यांनी सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली पाहणी सोबत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी नगराध्यक्ष सुधीर आप्पा सराफ 
मागील २४ तासात हिंगोलीत मोठया प्रमाणात मुसळधार पाउस पडल्याने  सोमवारी १४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . त्यामूळे मुसळधार पावसाने शेत जमिनी खरडल्या असून खरिप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली विधानसभेत कोणत्याही आजी माजी नेत्याने शेतकऱ्यांची साधी चौकशी तर सोडाच भेट दिली नाही.त्यामूळे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांनी शेतकऱ्यांची तळमळ पाहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देण्यासाठी विधानसभा मतदार संघाचा भर पावसात केला. आप्पा यांनी विधानसभा मतदारसंघात भेटी देऊन पुरातून मार्ग काढत पिकांची पाहणी केली. यांचा अहवाल त्यांनी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना माहिती देताच मंगळवारी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी आज हिंगोली विधानसभेतील पूरग्रस्त भागातील नागरीकांना भेटी देऊन गावांची तसेच पिकांची पाहणी केली,. यावेळी देशमुख यांनी अडोळ येथील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करून जिल्हाधिकारी यांना फोन द्वारे सूचना दिल्या. तातडीने पूल दुरुस्त करण्याचे आदेश देऊन तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचे जिल्हा प्रशासनाला अमित देशमुख यांनी निर्देश दिले.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांनी देखील सोमवारी पालकमंत्री  अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसाभरपाईची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने