भारत प्राथमिक विद्यालयातील गैर वर्तणूक प्रकरणी शिक्षकाचे निलंबन

भारत प्राथमिक विद्यालयातील गैर वर्तणूक प्रकरणी शिक्षकाचे  निलंबन

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
27 सप्टेंबर 2024 
हिंगोली : शहरातील भारत
प्राथमिक विद्यालयातील शिक्षक रामदास बोरकर यांच्या विरुद्ध एका विद्यार्थीनीने तक्रार केल्यामुळे शाळा प्रशासनाने सदर शिक्षकास  निलंबित केले. अशा गैरवर्तणूक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली शहरातील नेहरू नगर भागातील भारत प्राथमिक विद्यालय असून शाळेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी एकाच भागात स्वच्छतागृह ठेवण्यात आलेले आहे. दोन
विद्यार्थीनींनी शाळा प्रशासनाकडे केली होती तक्रार
मुख्याध्यापकाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर काही पालकांनीही तात्काळ शाळेत धाव घेऊन तक्रार केली. या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही शाळेमध्ये भेट देऊन पाहणी केली होतीः परंतु या प्रकरणात पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिवसापूर्वी शाळेतील शिक्षक रामदास बोरकर हे स्वच्छतागृहात गेले; परंतु त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. काही वेळानंतर काही विद्यार्थीनी स्वच्छतागृहाकडे गेल्यानंतर त्यांना स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडाच असल्याचे दिसून आल्याने त्याबाबत

दरम्यान, या प्रकरणात विद्यार्थीनींनी शाळा प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीमुळे शिक्षक रामदास बोरकर याचे निलंबन २५ सप्टेंबरला

करण्यात आले. यानंतर सदर घटनेची चौकशी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपशिक्षण अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षण अधिकारी नितीन नेटके, विस्तार अधिकारी सुरेश सोनुने यांच्या पथकाने शाळेत प्रत्यक्ष पाहणी करून काही पालकांशी व विद्यार्थीनींशी संवाद साधला. या प्रकरणाचा अहवाल पथकाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशा घडलेल्या या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने