तलवारीने केक कापाल तर वाढदिवस पोलिस कोठडीत पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर

तलवारीने केक कापाल तर वाढदिवस पोलिस कोठडीत पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर 

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28 सप्टेंबर 2024 
 हिंगोली तलवार, खंजीरने केक कापून वाढदिवस साजरा करणारे कमी नाहीत, मात्र, तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करताना आढळून आल्यास बेट गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करताना काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा पोलिस कोठडीतच वाढदिवस साजरा करावा लागू शकतो
जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांचीही तपासणी केली जात आहे. यामुळे गुन्हेगारीला लगाम बसण्यास मदत झाली आहे. अनेक गुन्हेगारांनी आपला उपद्रव थांबविला आहे, तर काहींनी जिल्ह्यातून काढता पाय घेणेच पसंत केले आहे. यासोबतच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणा-यांविरुद्धही गुन्हे दाखल केले जात आहेत.
धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंडच पहला आहे.
तलवारीने केक कापणे
पडले महागात
हिंगोली शहरात काही दिवसांपूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करून फोटो सोशल मीडियावर टाकला होता. ही बाच स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या निदर्शनास येताच पथकाने तलवार जप्त करीत 'बर्थडे बॉय'वर कारवाई केली होती.
धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, तलवारीने केक कापणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली
जात आहे. थेट गुन्हे नोंदविले आत आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाकडून तलवार जप्त केली होती. त्यामुळे तलवारीने
यापूर्वीही तलवार, खंजीर आदी
जुलैअखेर ५३ जणांवर गुन्हे जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात पोलिसांनी ५३ जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.

पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून
तलवारीने केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात
आहेत.
 अशा फोटो. व्हिडीओवर सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत.
रस्त्यावर वाढदिवस
साजरा करणारेही रडारवर
दुचाकीवर केक ठेवून रात्री उशिरा वाढदिवस साजरा करण्याचे प्रकारही
वाढले आहेत
. रात्री उशिरा रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारेही आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
केक कापल्याचे आढळून आल्यास वाढदिवस थेट पोलिस  कोठडीतच साजरा  करावा लागणार , असे   पोलीस निरीक्षक नरेंद्र पडाळकर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने