वंचितच्यावतीने 8 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या हिंगोलीत मुलाखती ज्योतीपाल रणवीर

वंचितच्यावतीने 8 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या  हिंगोलीत मुलाखती 
ज्योतीपाल रणवीर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
06ऑक्टोबर 2024 
हिंगोली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये तथा प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव हिंगोली विधानसभा क्षेत्र, वसमत विधानसभा क्षेत्रासाठी व कळमनुरी औंढा नाग विधानसभा क्षेत्र वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य निवडणूक समन्वय समितीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष तथा  समितीच्या सदस्या मा. दिशा पिंकी  शेख ताई यांच्या प्रमुख उपस्थितीत 
 दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी
शासकीय विश्रामगृह हिंगोली
   हिंगोली, वसमत, कळमनुरी या तिन्ही विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्वच तीन्ही विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी आपला कार्य अहवाल व परिचय पत्र सोबत घेऊन उपस्थित रहावे. सर्वांना पक्षाची आजीवन सदस्य नोंदणी अनिवार्य असेल. तसेच वंचित बहुजन आघाडी च्या सर्व विंगचे पधादिकारी यांनी उपस्तित रहावे. 
असे आव्हान वंचितचे जिल्हा महासचिव ज्योतीपाल रणवीर जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव  खरात तालुकाध्यक्ष  विनोदराव नाईक  यांनी केले आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने