आई जगदंबा महोत्सवाच्या गरबा-दांडिया महोत्सवाचे थाटात उदघाटन : अभिनेत्री सुप्रिया सोन्नेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

आई जगदंबा महोत्सवाच्या गरबा-दांडिया महोत्सवाचे  थाटात उदघाटन : अभिनेत्री सुप्रिया सोन्नेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
06 ऑक्टोबर 2024 
हिंगोली/- प्रतिनिधी
आई जगदंबा नवरात्र महोत्सव समिती एनटीसी हिंगोली च्या वतीने आयोजित पाच दिवसीय  गरबा - दांडिया महोत्सवाचे उदघाटन अभिनेत्री सुप्रिया सोन्नेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हजारो दांडिया व गरबा रसिकांनी आई जगदंबा मातेचा जयघोष केला. 
शनिवार दि. ५ आॅक्टोबर रोजी हाॅटेल शिवलिला पॅलेस येथे आई जगदंबा गरबा व दांडिया महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने पाच दिवसीय महोत्सवाचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न झाला. प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया सोन्नेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून भव्य दांडिया महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन सोहळ्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, युवा नेते श्री शिवाजी मुटकूळे, पोलिस निरीक्षक श्री. नरेंद्र पाडाळकर, प्रसिद्ध व्यावसायिक श्री. राजेंद्र साबू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपस्थित भाविक भक्ताना व दांडिया रसिकांना नवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या. पोलिस आपल्या संरक्षणासाठी कटिबध्द असल्याचे ते म्हणाले. दांडिया स्पर्धेची सुरूवात बाल चिमुकल्या मंडळीच्या दांडियाने झाली. ऐकून पाच फेरी मध्ये हजारो दांडिया व गरबा रसिकांनी सहभाग घेतला. विविध वयोगटातील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा लागलीच करण्यात आला. आई जगदंबा गरबा व दांडिया महोत्सव समितीने हिंगोली मधील सर्वात मोठै आयोजन केले असून दांडिया रसिकांना महोत्सवात निशुल्क प्रवेश पासेस उपलब्ध केल्या आहेत. दांडिया स्थळी निसर्ग सुंदर वातावरण, विद्युत रोषणाईचा झगमगाट व आई जगदंबेचा गजर यामुळे आनंदोत्सव व जल्लोष झाला. भक्तीरसात तल्लीन लहान मोठे दांडिया मध्ये रमून गेले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी आई जगदंबा गरबा व दांडिया महोत्सव समिती हिंगोली परिश्रम करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने