आ. संतोष बांगर यांची महायुतीच्या वतीने 2 डिसेंबरला विजयी मिरवणूक

 आ. संतोष बांगर यांची 
महायुतीच्या वतीने 2 डिसेंबरला विजयी भव्य  मिरवणूक 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
01 डिसेंबर 2024 
हिंगोली 
कळमनुरी विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांचा विक्रमी मताने विजय झाल्याने दोन डिसेंबरला महायुतीची भव्य विजय मिरवणूक काढली जाणार आहे. महायुतीचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघात विधानसभा विक्रमी
मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे २ डिसेंबरला महायुतीच्या भव्य विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून सकाळी १० वाजता विजय मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर वारंगा फाटा सकाळी १०:३० वाजता आखाडा बाळापूर संकाळी ११

वाजता ११:३० कळमनुरी वाजता हिंगोली दुपारी बारा वाजता तर या मिरवणुकीचा समारोप औंढा नागनाथ येथे दुपारी १२:३० वाजता होणार आहे. त्यामुळे या विजयी मिरवणुकीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महायुतीच्या वतीने  करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने