आमचे शौचालय-आमचा सन्मान मोहिम जिल्हयातील
ग्रामपंचायत मध्ये राबविणार
सिईओ नेहा भोसले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
05 डिसेंबर 2024
हिंगोली
जागतिक शौचालय दिन विशेष म्हणुन जिल्ह्यात आमचे शौचालय आमचा सन्मान ही मोहीम जिल्ह्यात राबविणार असल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले. जागतिक शौचालय दिनानिमित्त. १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धे अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छता वापर रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख तसेच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्याचा राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. १० डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या मोहिमेत ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सहभाग घेण्याचे आवाहन सीईओ नेहा भोसले
यांनी केले आहे.
जिल्ह्यात वैयक्तिक सार्वजनिक व शौचालयाचा वापर व दुरुस्ती सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिन विशेष मोहीम १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर यादरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. नादुरुस्त शौचालय वापरात आणणे शिवाय आणि पाण्यासाठी नळ जोडणी तसेच विज जोडणीं व्यवस्था करणे, व्यवस्थित दरवाजा, कडी कोंडा दुरुस्तीवर भर देऊन आपले शौचालय उत्कृष्ट करावे या करिता ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर पर्यंत प्रत्येक गावात शौचालय निर्मितीसाठी विशेष गृह संपर्क म्हणून ग्रहभेटीच्या आयोजित करण्यात येणार. त्या दरम्यान हा नादुरुस्त शौचालय शोधून दुरुस्ती करण्याचे आवाहन
देखील ग्रामपंचायत करणार आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने
गावातील मोहिमेतील उत्कृष्ट निर्माण केलेल्या वैयक्तिक शौचालय यांना दोन कुटुंबांना ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच या दोन कुटुंबाचे नावे पंचायत समिती मार्फत जिल्हास्तरावर सन्मान करण्यासाठी पाठवणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट शौचालय पाच कुटुंबाची निवड जिल्हा स्तरावर होणार आहे प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक शौचालय प्रस्तावाची पाहणी केल्यानंतर तीन सर्व उत्कृष्ट सार्वजनिक शौचालय निर्मिती करणे करिता सार्वजनिक शौचालय निर्मिती परिश्रम घेतलेल्या सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे.
आमचे शौचालय- आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी सर्व सहभाग घ्यावा तसे सर्व गावातील कुटुंबाने सहभाग घ्यावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा