वंचित उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर झालेला हल्ला बनावट डॉ. मस्के सह तिघांना अटक

 वंचित उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर झालेला  हल्ला  बनावट 
डॉ. मस्के सह तिघांना अटक
 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
10 डिसेंबर 2024 
 हिंगोली विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हे दि.१८/११/२०२४ रोजी मध्यरात्री १२.३० ते ०१.०० वा. चे दरम्यान हिंगोली कडे येत असतांना सेलसुरा पाटीजवळ एका पांढ-या रंगाच्या कारमधील अज्ञात ०५ इसमांनी डॉ. दिलीप मस्के यांची गाडी फोडुन डॉ. मस्के यांच्या छातीला मार लागल्या संदर्भाने पो.स्टे. कळमनुरी येथे गुन्हा दाखल होता.
आरोपी डॉक्टर दिलीप  मस्के 
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी घटनास्थळ भेट देवुन सदर गुन्हयाचा छडा लावण्यासंदर्भाने पो. नि. श्री विकास पाटील, स्था.गु. शा. व पो.नि.श्री मोहन भोसले, पो.स्टे. कळमनुरी यांना सुचना दिल्या होत्या. तसेच पोनि. विकास पाटील यांच्या नियंत्रणात सपोनि. श्री शिवसांब घेवारे, स्था. गु.शा. यांचे पथक सदर गुन्हा उघड करण्यासंदर्भाने काम करीत होते.
पोलीस पथकाने घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुरावा, तांत्रिक पुरावा याचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवीले असता असे निष्पन्न झाले की; डॉ. दिलीप मस्के यांना सहानुभुती मिळवीण्यासाठी डॉ. सुरज राठोड यांनी त्यांचे नातेवाईक नामे पवन बन्सी पवार, रा. भारूकानगर, हिंगोली यांच्या मार्फतीने त्याचे मित्र नामे सोमनाथ प्रकाश चांदिवाले, वैभव शिवाजीराव राठोड, महेश संभाजी भांगे, रामदास शंकरअप्पा चपटे, गोपाल मारोतराव धोंडे सर्व रा. वसमत यांना कळमनुरी येथे बोलावुन घेवुन डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी सांगीतले. परंतु वरील मुलांनी सदर घटना करण्यास नकार दिल्यामुळे डॉ. सुरज राठोड, डॉ. दिलीप मस्के व गाडी चालक अफताप रहिम खॉ पठाण यांनी सदर गाडी फोडुन बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्वतःचीच गाडी फोडणारे आरोपी नामे १. डॉ. सुरज राठोड, २. डॉ. दिलीप मस्के, ३. अफताप रहिम खॉ पठाण यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक हिंगोली, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री विकास पाटील, पो.नि.स्था.गु.शा., पो.नि.श्री मोहन भोसले, पो.स्टे. कळमनुरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे सपोनि. शिवसांब घेवारे, सपोनि. रघुनाथ शेवाळे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, आझम प्यारेवाले, शेकुराव बेले, दत्ता नागरे यांनी केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने