एम एस ई बी च्या उपअभियंत्यांसह तिघांवर गुन्हा दाखल सेनगावातील घटना

 एम एस ई बी च्या उपअभियंत्यांसह तिघांवर गुन्हा दाखल 
सेनगावातील घटना

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क न
07 डिसेंबर 2024
हिंगोली जिल्ह्यातील  सेनगाव येथे जीर्ण झालेली
विद्युत प्रवाह सुरू असलेली तार अंगावर पडल्याने शनिवारी एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमएसईबीच्या प्रभारी उपअभियंत्यांसह इंजिनिअर व लाइनमनवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 
सेनगाव येथील बसस्थानक भागात असलेल्या ऑटोमोबाइल दुकानासमोर जीर्ण झालेली विद्युत प्रवाह सुरू असलेली तार अंगावर पडून शनिवारी राजेखों दौलत खाँ पठाण (वय ६१, रा. कवठा बु.) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्तार राजे खॉ पठाण (रा. कवठा) यांच्या फिर्यादीवरून प्रभारी उपअभियंता सत्यनारायण वडगावकर,

इंजिनिअर राजेश जांभुळे, लाइनमन दत्ता आंभोरे (सर्व रा. एमएसईबी कार्यालय, सेनगाव) यांच्याविरूद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

मुख्य विद्युत प्रवाह सुरू असलेली जीर्ण झालेली तार दुरूस्त न केल्यामुळे आरोपींच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तार तुटून खाली पडली. त्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने राजे खाँ यांच्या मानेवर, डोक्यावर, पाठीवर व कंबरेला विद्युत शॉक लागून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक सोनकांबळे तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने