व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उंडाळ


व्हाईस ऑफ मीडियाच्या 
जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उंडाळ

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
23 जानेवारी 2025 
हिंगोली :  व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उंडाळ तर विभागीय सरचिटणीसपदी रमेश कदम यांची निवड निवड करण्यात आली. 
 व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांचा कार्यकाळ संपल्याने नूतन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात २२ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे सस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची आगामी काळातील दिशा व कामकाजाची माहिती दिली.
 पत्रकारांचे  आरोग्य घरकुल योजना  शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देईल व संघटनेचे  बळकटीकरण करणार 
जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उडाळ यांनी  सांगितलं 

त्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात माहिती देवून उपस्थित सदस्यांचे मत जाणून घेतले. यावेळी ज्ञानेश्वर उंडाळ यांची जिल्हाध्यक्षपदी तर रमेश कदम यांची विभागीय सरचिटणीसपदी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले.  यावेळी रमेश चेंडके, माधव दीपके, गजानन लोढ़े, गजानन वाणी , श्रीधर वाळवटे, नंदकिशोर कांबळे, चंद्रमुनी बलखंडे, सचिन कवडे, विजय गुंडेकर, शितळे, जाधव, रंगनाथ नरवाडे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने