दुर्मिळ मांडूळ सापाची तस्करी केल्याच्या प्रकरणातील पाचही आरोपींची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 जानेवारी 2025
घटनेची
सविस्तर माहिती अशी की
दि. 24.01.2025 रोजी मौजे बळसोंड ता. जिल्हा हिंगोली येथे धाडीची कार्यवाही करून तस्करीच्या उद्देशाने बाळगलेला मांडुळ जातीचा साप ( Sand Boa 'Eryx johnii' ) वन विभागाने जप्त केला होता व कारवाई मध्ये ऐकून ५ संशयिताना वन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले. तसेच सदर कारवाई मध्ये 1 मांडूळ प्रजातीचा साप, 2 मोटरसायकल व 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. वन विभागाच्या पथकाने संशयित नामे 1. विठ्ठल सोपान गायकवाड रा. बळसोंड ता.जि. हिंगोली, 2. गजानन शालीक कांबळे रा.चिंचोली ता. डिग्रस जि. वाशीम, 3. गजानन उत्तम वाणी रा. बामणगाव ता.जी. वाशीम, 4. देवानंद मोतीराम कांबळे रा. बोरी बु.ता.जी. हिंगोली व 5. नंदु शेषराव वानखेडे वय रा. सोनाळा ता. मालेगाव जि. वाशीम यांना अटक करून वन्यजिव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 11 व 51 अन्वये वन गुन्हा क्र नोंद 01/2025 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील आरोपींनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. न्याय दंडाधिकारी साहेब प्रथम श्रेणी हिंगोली यांच्या न्यायलयात जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि.न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, मा. श्री डी यु राजपुत साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 28/01/2025 रोजी आरोपींची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा