ॲट्रोसिटी, घरात घुसून चाकुने गंभीर जख्मी प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
12 फेब्रुवारी 2024
घटनेची
सविस्तर माहिती अशी की
पोलीस स्टेशन बासंबा येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, दि.26/09/2024 रोजी फिर्यादी किराणा दुकानावर असतांना आरोपींनी गावात चोर म्हणून बदनामी का केली असे म्हणून फिर्यादीला जातीवाचक शीवीगाऴ केली व अपमानित केले आणि त्यानंतर फिर्यादी घरी आल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीला बाहेर काढले व चाकुने आणि स्क्रुड्रायवर ने मारून गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बासंबा येथे गु. र. नं. 293/2024 कलम 115(2), 118(1), 333, 352, 351(2), 3(5), भारतीय न्याय संहीता 2023 व 3(1)(r)(s), 3(2)(va) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे आशुतोष निलु ढाले यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर व्ही लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 01/02/2025 रोजी आरोपीची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा