बहुचर्चित जिल्हा परिषद गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
5 फेब्रुवारी 2025
गोळीबार प्रकरणातील घटनेची माहिती अशी की
हिंगोली येथील जिल्हा परिषद आवारामध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण हे त्यांच्या कार मध्ये बसत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता .
पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे जिल्हा परिषद येथील गोळीबार प्रकरणी गुरनं. 658/2023 कलम 307, 120 (ब), 34 भांदवी व सह कलम 3 /25 शस्त्र अधिनियम कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यामध्ये अटक मुख्य आरोपी अक्षय गुरुदत्त इंदौरीया याने मा .उच्च न्यायलय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे नियमीत जामीन साठी अर्ज दाखल केला होता
तरी दि. 03.02.2025 रोजी मा.न्यायमुर्ती साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने मा. उच्च न्यायलयाचा औरगाबाद खंडपिठात ॲड अभय ओस्टवाल व ॲड अर्पित कमलकिशोर बगडीया यांनी बाजु मांडून युक्ती वाद केला व त्यांना ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा