राज्यमंत्री मेघना बोर्डीकर हिंगोलीच्या संपर्कमंत्री

राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर हिंगोलीच्या संपर्कमंत्री 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
6 फेब्रुवारी 2025
हिंगोली 
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब
कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्ष आणि सरकार यामधील समन्वय साधण्यासाठी भाजपने जिल्हा संपर्क मंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राज्यातील १७ संपर्कमंत्र्यांच्या नियुक्तीचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ५ फेब्रुवारी रोजी काढले. त्यात हिंगोली जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील   पक्ष संघटन वाढीस मदत होईल. शिवाय राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभतळागाळापर्यंत पहोचविण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने