हिंगोली जिपच्या नवीन अंजली रमेश सीईओ नेहा भोसले यांची अचानक बदली

 हिंगोली जि प च्या  नवीन अंजली रमेश  सीईओ  नेहा भोसले यांची बदली

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
26 मार्च 2025 
हिंगोली : आठ महिन्यांपूर्वी हिंगोली
जि.प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी रूजू झालेल्या नेहा भोसले यांची अचानक बदली झाली आहे. त्यांच्या जागी मध्यप्रदेश संवर्गातून आलेल्या अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंजली रमेश यांनी २०१६ मध्ये आयआयटी मद्रास येथून ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी अहमदाबाद आयआयएम मधून व्यवस्थापनाचीही पदवी मिळविली आहे. यूपीएससी परीक्षेत देशात ४९४ वा क्रमांक मिळविलेल्या अंजली रमेश यांचे वडील रमेशचंद्र मीणा हे सुध्दा आयएएस अधिकारी आहेत. शिवाय त्यांची धाकटी बहिण अनामिका सुध्दा यूपीएसएसी उत्तीर्ण आहे. मध्यप्रदेश शासनात उपविभागीय अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर काम केले
आता जिल्हा परिषद  कामकाजामध्ये गती प्राप्त होईल 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने