हिंगोलीचा अंशुल सरनायक उच्च शिक्षणासाठी जर्मनीत दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18 एप्रिल 2025
हिंगोली जिल्हा पत्रकार क्रिकेट संघातर्फे अंशुल सरनायक याचा उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे जात असल्याबद्दल जंगी सत्कार
हिंगोली जिल्ह्यातील सवना येथील पत्रकार गोपालराव सरनायक यांचा मोठा मुलगा चि.अंशुल गोपालराव सरनायक हा जर्मनी येथे मास्टर्स इन डेटा सायन्स हा कोर्स करण्यासाठी जात असल्यामुळे हिंगोली जिल्हा पत्रकार क्रिकेट संघ यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.
जर्मनी येथील ट्रायर या शहरात ट्रायर युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर इन डेटा सायन्स हि दोन वर्षाची पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी अंशुल सरनायक जात असल्यामुळे त्याचा सत्कार पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार शिवाजीराव मेटकर यांच्या हस्ते व दैनिक भास्कर चे जिल्हा प्रतिनिधी राकेश भट्ट, दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी प्रसाद आर्वीकर, न्यूज माध्यम २३ चे जिल्हा प्रतिनिधी प्रदुग्न गिरीकर, दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन कावडे, दैनिक लोकमत समाचार चे जिल्हा प्रतिनिधी दिलीप हळदे, एमकेएन मराठी न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी सुधाकर वाढवे, दैनिक लोकमतचे शाखा व्यवस्थापक मयूर नखाते, दैनिक तरुण भारतचे विजय गुंडेकर, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी रमेश वाबळे, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक,दैनिक सामना तालुका प्रतिनिधी गोपालराव सरनायक, फोटोग्राफर संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गरवारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाकडून सुधाकर वाढवे यांनी जर्मनी अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने यश संपादन करावे असे सांगून गोपालराव सरनायक व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी मर्चंट नेव्ही डेककॉडेक पदवी प्राप्त सुजल सरनायक याची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा