माजी आ. गजानन घुगे यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
गांधी चौकात जल्लोष
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
14 मे 2025
हिंगोली : माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव घुगे यांची मंगळवारी भाजपा जिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
माजी आमदार गजाननराव घुगे यांनी दोन वेळा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते मागील पंधरा वर्षापासून परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. यासोबतच दोन दशकांपासुन ते हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समितीचे
संचालक आहेत.
तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्षही आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्यापासुन गजानन घुगे यांच्या नावाची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. तेंव्हापासुन ओबीसी नेत्यांना भाजपने संधी द्यावी अशी मागणी होत होती. घुगे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची धुरा आल्याने आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद
निवडणुकीत भाजपला अनुभवी जिल्हाध्यक्ष मिळाल्याचा लाभ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.केला जात आहे
तब्बल ९ वर्षानंतर भाजपाने ओबीसी नेतृत्वाला दिली संधी
भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी यापूर्वी माजी नगराध्यक्षबाबाराव बागर यानासन २०१० ते २०१३ आणि सन २०१३ ते २०१६ या दरम्यान तब्बल ६ वर्ष जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होते. त्यानंतर आता तब्बल ९ वर्षानंतर माजी आमदार गजाननराव घुगे यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान निवडी बदल गांधी चौक येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला
टिप्पणी पोस्ट करा