बेपत्ता महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला औंढ्यात खळबळ


बेपत्ता महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला औंढ्यात खळबळ 

महाराष्ट्र 24 न्यूज  नेटवर्क 
13में 2025
औंढा नागनाथ  शहरातील
बसस्थानकाच्या पाठीमागील टेकडीवर १२ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने  शहरात व  परिसरात खळबळ उडाली. दरम्यान,  मृतदेह दहा दिवसांपूर्वी पिंपळदरी येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

औंढा नागनाथ बसस्थानकाच्या पाठीमागे टेकडीवर एका अनोळखी स्त्रीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक अफसर

३ मे रोजी महिला बेपत्ता झाल्याची औंढा पोलीस  ठाण्यात नोंद
पठाण, जमादार गजानन गिरी, जमादार वसीम पठाण, ओंकारेश्वर राजनेकर, ज्ञानेश्वर गोरे, माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटली नसली तरी हा मृतदेह पिंपळदरी येथील बेपत्ता स्वाती सतीश भगत (३५) या महिलेचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, स्वाती भगत ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ३ मे रोजी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने