बुद्ध जयंती दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात रुग्णांना खिर वाटप खिरदान करण्याचा मिलिंद उबाळे मित्र मंडळाचा सलग पंधरा वर्षाचा उपक्रम
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
12में 2025
हिंगोली शहरातील शासकीय रुग्णालयात बुद्ध जयंती दिनानिमित्त मिलिंद उबाळे मित्र मंडळाच्या वतीने सलग 15 वर्षा पासून शासकीय रुग्णालयातील रुग्णांना खिर वाटप खिरदान करत असतात.
यावेळी हि खिरदान करण्यात आली.
सर्व प्रथम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मुर्तिला पुष्प अर्पण करून व बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले, यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोलीचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, माजी नगरसेवक अनिल नेनवानी, काॅंग्रेस पक्षाचे नेते सुरेशअप्पा सराफ, माजी नगरसेविका सौ.आशाताई उबाळे, सुमित चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उबाळे, भिमशक्तीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, डॉ.दिपक मोरे, डॉ.मनिष बगडिया, आबेदअली जहांगीरदार, निरज देशमुख, कैलास डिडाळे, जुबेर मामु, विनीत उबाळे, बंडु नरवाडे, हारुण पठाण, बि.के.लांडगे, अशोक गायकवाड, विनोद पाईकराव, परिचारिका शेवडीकर, संतोष खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विवेक मोरे यांनी तर आभार सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उबाळे यांनी मानले.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिका यांना माजी नगरसेविका सौ.आशाताई उबाळे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
टिप्पणी पोस्ट करा