महिला शिक्षिकेच्या बॅगमधील ३८ ग्रॅमचे दागिने बस मधून लंपास
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
08 मे 2025
हिंगोली : बसमध्ये बसत असताना
गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शिक्षिकेच्या बॅगमधील ३८ ग्रॅमचे दागिने लंपास केल्याची घटना ७ मे रोजी दुपारी ३:२० वाजेच्या सुमारास हिंगोली बसस्थानकावर घडली आहे..
अमरावती येथील शिक्षिका मेघा तुषार साकळे या ७ मे रोजी कळमनुरी येथे जाण्यासाठी हिंगोली बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी जळगाव ते नांदेड बस आल्यानंतर त्या बसमध्ये बसत होत्या. यावेळी प्रवाशांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मेघा साकळे यांच्या हँड बॅगमधील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले झुंबर, दोन ग्रॅम वजनाचे कानातले, ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे
बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा ची व्यवस्था करावी
गळ्यातील गोफ, ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, असा एकूण ३८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही बाब समजताच मेघा साकळे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिस अंमलदार संजय मार्के तपास करीत आहेत.
बस स्थानकात
पोलीस असताना चोरी झाली कशी
असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे
हिंगोली जिल्ह्यातील बसस्थानकावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. मागील काही दिवसांत सातत्याने चोऱ्या होत आहेत. विशेष म्हणजे या बसस्थानकावर पोलिस चौकी उभारली आहे. मात्र त्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती असताना चोरटे कशी चोरी करत आहेत पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बसस्थानकावर कायमस्वरुपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
चोरीच्या घटना वाढल्यामुळे
बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा बसण्याची व्यवस्था करावी अशी प्रवाशाची मागणी आहे
टिप्पणी पोस्ट करा