अवैध गांजा लागवडी विरूध्द कार्यवाही, सहा गांज्याचे झाडासह ८७,०००/- रू चे मुददेमालासह एकास घेतले ताब्यात


अवैध गांजा लागवडी विरूध्द कार्यवाही, सहा गांज्याचे झाडासह ८७,०००/- रू चे मुददेमालासह एकास घेतले ताब्यात
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
6में 2025

स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली व पो.स्टे. हटटा ची संयुक्त कार्यवाही
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि.०१/०५/२०२५ ते दि.३०/०५/२०२५ रोजी पावेतो अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी मोहिम राबवीणेचे आदेशाने  मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्हयात अवैध गांजा लागवड व साठवणुक विरोधात कठोर मोहिम राबवुन कार्यवाही करण्याबाबत पो.नि. श्री. विकास पाटील, स्था. गु.शा. हिंगोली व जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. विकास पाटील यांना गोपनिय बातमी मिळाली की पो.स्टे. हटटा हददीत मौजे रांजोना शिवारात एका भुईमुंगीच्या शेतामध्ये अवैधपणे लागवड केलेले सहा गांज्याचे झाडे आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सपोनि. श्री घेवारे व पथक यांना सुचना दिल्याच्या अनुषंगाने स्था.गु.शा. व पो.स्टे.चे सपोनि. संग्राम जाधव असे संयुक्तरीत्या मौजे रांजोना शिवारात शेत गट क्रमांक ७२ मधील वहितीदार रामदास विठठल साळवे, रा. रांजोना, ता. वसमत याच्या शेतात छापा मारला असता सदर ठिकाणी अंदाजे सोडतीन ते चार फुट उंचीची ओली ०६ झाडे ४.३७० किलोग्रॅम वजनाचे अंदाजीत किंमती ८७,०००/- रूपयाचे मिळून आल्याने कायदेशीररीत्या जप्त करून शेती वहितीदार रामदास विठठल साळवे, वय ३५ वर्ष, रा.रांजोना, ता. वसमत, जि. हिंगोली याच्याविरूध्द एन.डी.पी.एस. कायदा १९८५ कलम ८ (अ), ८ (ब), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

त्री हिंगोली पोलीसांव्दारे सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की गांजा व तत्सम गुंगीकारक पदार्थ बेकायदेशीरपणे कुणीही लागवड करू नये किंवा बाळगु नये अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल.

स्दरची कार्यवाही मा.प्र. पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार केंदे, पो.नि.श्री. विकास पाटील, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. शिवसांब घेवारे, सपोनि. संग्राम सांगळे, पो.स्टे. हटटा, पोलीस अंमलदार कृष्णा चव्हाण, नितीन गोरे, गजानन पोकळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, प्रितम चव्हाण, दिंडे, आसीफ, सुरूसे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने