हिंगोली बांधकाम विभाग प्रथम; तर हिंगोली न.प. द्वितीय१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा उपक्रम


 हिंगोली  बांधकाम विभाग प्रथम; तर हिंगोली न.प. द्वितीय
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा उपक्रम

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17मे2025
हिंगोली : शासकीय कार्यालयांच्या
कामांत पारदर्शकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने राबविलेल्या १०० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात येथील सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालय विभागात प्रथम आले असून, हिंगोली नगरपरिषदेने द्वितीय क्रमांक पटकावला  आहे.
कार्यकारी अभियंता डी .जी.
पोतरे अभियंता सुदेश देशमुख यांनी जिल्ह्यात शासनाचा शंभर दिवस उपक्रम राबविला आणि प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना हिंगोली शहर पोलीस स्टेशन  पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर पत्रकार सुधाकर वाढवे सुनील पाठक विजय गुंडेकर गोपाल सरनाईक यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 
शासकीय कामकाजात सुधारणा व्हावी, कामकाज पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली होती. त्यात सर्व शासकीय कार्यालयांना सहभागी केले होते. या उपक्रमाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर विभागस्तरावरील निकाल १६ मे रोजी

या कार्यालयांची विभागात सरशी

प्रथम : उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, तालुका क्रीडा कार्यालय, वसमत. द्वितीय : मुख्याधिकारी, हिंगोली नगरपालिका, तृतीयः उर्ध्व पैनगंगा प्र. वि. पथक क्र. ४, आखाडा बाळापूर, गटविकास अधिकारी कार्यालय, वसमत, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, कळमनुरी
जाहीर करण्यात आले.

हिंगोली येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालय आणि वसमत येथील तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर हिंगोली मुख्याधिकाऱ्यांना या उपक्रमात विभागात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. त्याचप्रमाणे आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग पथक क्रमांक ४, गटविकास अधिकारी कार्यालय वसमत आणि गटशिक्षणाधिकारी कळमनुरी या कार्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. मात्र काही कार्यालयातील  अधिकाऱ्याने फोटो काढून नुसता देखावा केल्याचे दिसून आले हे तेवढे सत्य आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने