मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली जिल्हा दौरा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28में 2025
हिंगोली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार (दि.२९) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी २.१५ वाजता संत नामदेव पोलीस परेड मैदान हेलिपॅड, हिंगोली येथे आगमन होईल. त्यानंतर
दुपारी २.२०वा. मोटारीने रामलीला मैदानाकडे प्रयाण,
दुपारी २.३० वाजता शेतकरी व महिला मेळावा आणि हिंगोली विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे दुपारी ३.४५ वा. मोटारीने संत नामदेव पोलीस परेड मैदान हेलिपॅडकडे प्रयाण करतील व त्यानंतर ३.५५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील.
टिप्पणी पोस्ट करा