हिंगोलीत अवैध रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली पकडली पोलिसात गुन्हा दाखल

 हिंगोलीत अवैध रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली पकडली 
पोलिसात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
11 जून 2025 
हिंगोली : शहरातील जवळा पळशी रस्त्यावर स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ १० जून रोजी हिंगोली शहर पोलिसांनी अवैध रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली पकडून दोघावर गुन्हा दाखल केला.

एमएच ३८ एडी ८७०३ या ट्रॅक्टर ट्रॉलीतून स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळून एक ब्रास वाळू शासनाचा महसुल बुडवून चोरटी विक्री करण्याकरीता घेऊन जात असताना हिंगोली शहर पोलिसांना मिळून आल्याने ८ लाख रुपयाची ट्रॅक्टर ट्रॉली ४ हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकुण ८ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला. हिंगोली शहर पोलिसात मोहम्मद अहेमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिक शेख मन्नू, अजिस उस्मान बेग रा. सम्राट अशोक नगर हिंगोली या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, पोहेकॉ शेख मुजीब शेख मोहम्मद, महिला पोलिस शिपाई स्वाती पिपरे, अजहर पठाण, संतोष करे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने