सुनील देवडा यांना सहकार क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 जून 2025
हिंगोली
सहकाररत्न ओमप्रकाशजी देवडा आज आपल्यामध्ये नाहीत. आपल्या सर्वांना तसेच विषेशतः सहकार क्षेत्राला ही उणीव कायम जाणवणारी असून भाऊंच्या कार्याचा समृद्ध वारसा आज त्यांचे चिरंजीव त्याच जिद्दीने गिरबित आहेत. सुनिल ओम प्रकाश देवडा यांचा सुसंस्कृत स्वभाव, त्यांची कार्यप्रणाली, कार्यक्षमता, संपर्क, प्रवास आदी गोष्टींवर नजर टाकली असता, आपल्याला मोठ्या भाऊंची आठवण येते. ओमप्रकाश भाऊंचे प्रतिबिंब आपण सुनिल भाऊंमध्ये नक्कीच पाहू शकतो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ओमप्रकाश देवडा पीपल्स को. ऑप. बँक लि., हिंगोली चे सुनील भाऊ माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष असुन त्यांच्या कार्यकाळात बँकेचा विस्तार राज्यभरात झाला असून बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र तेलंगणामध्ये कार्यरत आहे बँकेच्या एकूण 33 शाखा कार्यरत असून 1200 कोटी रुपयांचा व्यवहार आहे बँकेला एफएसडब्ल्यूएम दर्जा प्राप्त आहे बँकेच्या स्थापनेस 42 वर्षे पूर्ण झाले असुन मराठवाडा अर्बन बँक्स् को ऑप.असोसिएशन लि., छत्रपती संभाजीनगर विद्यमान उपाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य अर्बन को.ऑप.बँक फेडरेशन लि., मुंबई विद्यमान उपाध्यक्ष,नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को. ऑप.बँक्स अॅन्ड क्रेडिट सोसायटी लि; नवी दिल्ली- विद्यमान संचालक,भारतीय रिझर्व्ह बँक सदस्य,गांधी सेवा ट्रस्ट, हिंगोली विद्यमान संचिव
आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने सहकार क्षेत्रातील पहिला मराठवाडा भूषण 2025 पुरस्कार जाहीर झाला असून 15 जून रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवराच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष गजानन मगर यांनी दिली.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई मराठवाडा विभागाच्या वतीने पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि मराठवाडा भुषण पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन रविवार दि. १५ जुन रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंग मंदीर उस्मानपुरा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पहिला पुरस्कार रविवारी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प.पु. १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यसभेचे खा. डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ.प्रदिप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. संजय केनेकर, आ. संजनाताई जाधव, आ. अनुराधाताई चव्हाण, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडलाचे अध्यक्ष जयदिप कवाडे, जेष्ठ पत्रकार मधुकरआण्णा वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डिजीटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे तर विशेष अतिथी ह म्हणून एबीपी माझ्याच्या संपादीका सरिताताई कौशिक, प्रसिध्दी अभिनेते योगेश सिरसाट, बंगरूळूच्या पुर्णब्रम्ह प्रशासकीय संचालिका जयंतीताई कठाळे यांची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटनीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेशउपाध्यक्ष अशोक देडे, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ओमप्रकाश देवडा पीपल्स को.ऑप.बँक. हिंगोली चे उपाध्यक्ष सुनील देवडा यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र तेलंगणामध्ये कार्यरत आहे बँकेच्या एकूण 33 शाखा कार्यरत असून 1200 कोटी रुपयांचा व्यवहार आहे बँकेला एफएसडब्ल्यूएम दर्जा प्राप्त आहे बँकेच्या स्थापनेस 42 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा सहकार क्षेत्रामधून मराठवाडा भूषण २०२५ जाहीर करण्यात आला आहे ही निवड पत्रकार संघाच्या राज्यकारणीने मान्य केल्याबद्दल पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन मगर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील पत्रकारांसह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा