हिंगोली पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
19जून 2025
हिंगोली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाबाबत निधी उपलब्ध होऊनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले नसल्याने जिल्ह्यातील पाचही गट शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत गणवेश वाटप योजना लागू करण्यात आली असुन सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषद, पीएमश्री व नगर पालिका शाळेतील ८२ हजार ८८१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३०० रुपयाच्या एका गणवेशासाठी २ कोटी ४८ लाख ६४ हजार ३०० रुपये उपलब्ध झाल्याने जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर ही रक्कम शाळास्तरावर वर्ग
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले नसल्याने कारवाईची आली वेळ
करण्यात आली होती. शाळा १६ जून पासुन प्रारंभझाल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपा बाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांनीही शाळास्तरावर सुचना दिल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करणे अपेक्षीत होते. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यामध्येच गणवेशाचे मापे घेवून गणवेश शिलाई करून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. या संदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे कळविले होते. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश
यांनी १७ जूनला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये आढावा घेतला असता गणवेश वाटप झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांनी पाचही गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाबाबत कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा. तसेच गणवेश वितरणाबाबत केलेल्या दिरंगाईबद्दल आपणावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येवू नये याचा खुलासा सादर करण्याचे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा