ॲट्रोसिटी, खुनाचा प्रयत्न गंभीर प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर.
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
20जून2025
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 24/02/2025 रोजी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, दि.२३/०२/२०२५ रोजी ९ च्या सुमारास धानोरा येथील शिवजयंती कार्यक्रमात आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शीवीगाऴ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे जवऴील लोखंडी रॉड ने व दगडाने डोक्यात ,पाठीवर फिर्यादीच्या मारून गंभीर जखमी केले व फिर्यादीच्या मुलास व भावास घरासमोर येऊन शिवीगाळ करून मारहाण केली.
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गु. र. नं. 104/2025 कलम 109, 118(1),189(2)190,191(2)191(3) भारतीय न्याय संहीता 2023 व 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील आरोपी नामे १)मयूर सावने, २) सोमनाथ संगेकर ३) कृष्णा जाधव ४)बालाजी बुद्रुक ५) गणेश आनेवर ६)राहुल इंगळे यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री एस.एन.माने (गाडेकर) मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 17/06/2025 रोजी आरोपीची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा