पोलीस. होमगार्ड ला दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले एसीबीची कारवाई

 पोलीस. होमगार्ड ला 
 दहा हजाराची लाच  घेताना रंगे हात पकडले एसीबीची कारवाई 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
26 जून 2025 
सविस्तर माहिती अशी की 
लोकसेवक १) प्रविण गोपाळराव राठोड, वय ४१ वर्षे, व्यवसाय नौकरी, पद पोह/२१७ नेमणुक पोस्टे बासंबा, रा. कांचन नगर, कारवाडी, हिंगोली. व आरोपी २) दत्ता बळीराम दराडे, वय ४६ वर्ष, व्यवसाय शेती व होमगार्ड, रा. वंजारवाडा, बासंबा, ता. जि. हिंगोली. यांनी १२,०००/- रूपये लाचेची मागणी करून दिनांक २५.०६.२०२५ रोजीचे सापळा कारवाई दरम्यान १०,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण जि. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तकारदार यांनी दिनांक २५.०६.२०२५ रोजी तकार दिली की, तक्रारदार हे त्यांचे ऑटो रिक्षाने हिंगोली येथे प्रवाशी भाडे घेवुन आले असता, त्यांची पत्नी सौ. प्रतिमा यांनी तक्रारदार यांना फोन करून सांगीतले की, पो.स्टे. बासंबा येथील पोलीस आपल्या घरी आले व ते तुमच्या वडिलांना पोलीस स्टेशनला त्यांचे सोबत घेवुन गेले आहेत. त्यावरून तकारदार त्यांचे ऑटो रिक्षाने पोलीस स्टेशन बासंबा येथे गेले. बासंबा पोलीस स्टेशन येथे तकारदार व पोलीस हवालदार राठोड यांची समक्ष भेट झाली. तेथे तकारदार यांचे वडिल पोलीस स्टेशनला राठोड यांचे सोबत होते. तेव्हा पोलीस हवालदार राठोड हे तकारदार यांना म्हणाले की, तुमच्या वडिलांवर दारूची केस करणार आहे. दारूची केस करायची नसेल व गुन्हा दाखल करायचा नसेल तर, मला १०,०००/- रू द्यावे लागतील, असे म्हणुन लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांची तकार प्राप्त झाली होती.

दिनांक २५.०६.२०२५ रोजी सदर तकारीची पंच साक्षीदार यांचे समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आरोपी कमांक १) प्रविण राठोड यांनी तक्रारदार यांचे वडिलांवर विना परवाना दारू विकी करतो म्हणून केस न करण्यासाठी व वडिलांना सोडण्यासाठी आरोपी कमांक २) याचे मार्फतीने पंचासमक्ष १०,०००/- रू लाचेची मागणी करून लाच स्विकारण्यास सहमती दर्शवली. तसेच इथुन पुढं तुला दारू विकायची असेल तर प्रत्येक महिन्याला दोन-दोन हजार रूपये तुला द्यावे लागेल असे म्हणुन आरोपी कमांक १) याने तक्रारदाराकडे लाच मागणी केली.

दिनांक २५.०६.२०२५ रोजी यातील आरोपी क्रमांक १) प्रविण राठोड, पोलीस हवालदार यांनी लाचेची रक्कम घेवुन वाशिम-नांदेड रोडवरील ईसापुर पाटी येथे बोलविले. त्यावरून सापळ्याचे आयोजन केले. तक्रारदार हे लाचेची रक्कम घेवुन आरोपी कमांक १) यांना देण्यासाठी वाशिम-नांदेड रोडवरील ईसापुर पाटी तालुका हिंगोली येथे गेले. तेव्हा आरोपी कमांक १) यांनी लाचेची रक्कम आरोपी कमांक २) यांचेकडे देण्यास सांगीतली. त्यावरून आरोपी कमांक २) यांनी तक्रारदार यांचेकडुन आरोपी कमांक १) याचे सांगणेवरून १०,०००/- रू लाचेची रक्कम स्वतः स्विकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले. यातील तकारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमुद आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. श्री संदीप पालवे, पोलीस अधिक्षक, मा. डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री विकास घनवट, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो हिंगोली यांनी पोलीस निरीक्षक, श्रीमती अनिता दिनकर, सपोउपनि महमद युनुस, विजय शुक्ला, पोह/भगवान मंडलीक, पोह/राजाराम फुपाटे, गजानन पवार, 'रविंद्र वरणे, गोविंद शिंदे, मपोह/योगीता अवचार, पो.शि./शिवाजी वाघ, अमोल जाधव, विनोद पुंडगे, चापोह अकबर शेख,  यांनी कारवाईत सहभाग घेतला होता 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने