महाराष्ट्र प्रीमियर लीगचे भव्य उद्घाटन थाटात साजरे, ड्रोन शोद्वारे भारतीय सैन्यदलाला मानवंदना

महाराष्ट्र प्रीमियर लीगचे भव्य उद्घाटन थाटात साजरे,
 ड्रोन शोद्वारे भारतीय सैन्यदलाला मानवंदना

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
5 जून 2025 
    पुणे,  महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन  एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथे दिमाखात पार पडले आहे. या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ड्रोन शो, ज्याच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
     उद्घाटन सोहळ्याच्या वेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रोहितदादा पवार आणि एमसीएच्या अपेक्स कौन्सिलचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएल सारखी भव्य स्पर्धा यशस्वीपणे आकार घेत आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या कलागुणांना आता राज्यभरातील नव्हे तर देशभरातील प्रेक्षक समोर सादर होण्याची संधी मिळाली आहे......
या भव्य सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच आकर्षक आणि देखणा बनला. त्यांच्या स्टेजवरील सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. क्रिकेट आणि करमणूक यांचा सुंदर संगम या उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळाला...

    एमसिए आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करते आणि नुकत्याच भारत- पाकिस्तान दरम्यान झालेल्या चकमकी मध्ये आपल्या सैनिकांचे यश  राष्ट्राच्या रक्षणासाठी प्रेरणा देत असुन आपल्या भारतीय सैन्य दलातील शुर विरांना मानवंदना व अभिवादन म्हणून एमपीएल उदघाटन समारंभ भारतीय सशस्त्र दलांना समर्पीत करण्याचा निर्णय मा. रोहित दादांनी व एमसीए च्या सर्व अपेक्स मेंबर ने घेतला..
एमसीए चे अध्यक्ष श्री रोहीत दादा पवार यांच्या दुरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि प्रगल्भ विचारामुळे  महाराष्ट्रातील नवोदित क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
क्रिकेट, देशभक्ती आणि स्थानिक क्रीडा प्रतिभेचा संगम ठरलेला हा सोहळा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने