महिला एकटी लॉजमध्ये असताना नेता जबरदस्तीने घुसला



महाराष्ट24न्यूज नेटवर्क 
27जून2025
सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका नेत्याने लॉजच्या रुममध्ये घुसून एका महिलेवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मनोहर सपाटे असे गुन्हा दाखल झालेल्या शरद पवार गटाच्या नेत्याचे नाव आहे. तो सोलापूरचा माजी महापौर देखील राहिला आहे. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य देखील आहे.

मनोहर सपाटे याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत विनयभंग केला. तसेच दमदाटी केल्याचा आरोप विवाहीत महिलेने (वय ४५) केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तक्रारदार महिला पुणे येथे राहतात. त्या मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत. गावातील शेतीच्या वादामुळे कोर्ट केस सुरू आहे. त्यासाठी त्या सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी येत असतात. 14 जूनला त्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिल्या होत्या. सुरुवातीचे दोन दिवस त्यांचे वास्तव्य रूम नंबर 202 तर पुढील दोन दिवस त्या रूम नंबर 205 मध्ये राहिल्या.
16 जूनच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास मनोहर सपाटे याने रूमचा दरवाजा ठोठावून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी अश्लील हावभाव करीत विनयभंग केला. पीडित महिलेनं घाबरून 'तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता?' असे विचारले. तेव्हा आरोपीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही. कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला लगेच जामीन मिळतो, असे सांगत दमदाटी केली.

त्यानंतर आरोपीने वारंवार ून संपर्क करत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला. त्यानंतर पीडित महिला 24 जूनला अ‍ॅड. योगेश पवार यांचा सल्ला घेण्यासाठी सोलापुरात आल्या होत्या. त्याचवेळी पीडितेला सपाटेचा फोन आला. त्याने लॉजवरील रूम नंबर 307 वर येण्याचा आग्रह केला. त्यावेळी पीडितेनं स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले. 24 जूनला संध्याकाळी पीडितेनं रूम नं. 307 मध्ये जाऊन सपाटेंच्या कृत्याचे व्हिडीओ काढले. त्या व्हिडीओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून येत आहे. या व्हिडीओतील पुराव्याच्या आधारे महिलेने 25 जूनला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने