गंभीर व जबरी मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता ॲड जी.गायकवाड पाटील


  गंभीर व जबरी मारहाण  प्रकरणी निर्दोष  मुक्तता ॲड जी.गायकवाड पाटील 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
20 जुलै 2025 
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
आरोपी  संतोष परसराम इंगळे, राजू परसराम इंगळे, शुभम नंदकिशोर इंगळे, परसराम इंगळे ,राहणार सिरसम बु  तालुका जिल्हा हिंगोली 
याच्या विरोधात दिनांक 06 मे2020 रोजी फिर्यादीने अशी फिर्याद दिली की आरोपी  फिर्यादी यांच्या शेतात येऊन संतोष इंगळे यांनी दगडाने फिर्यादीस डोक्यात मारून जखमी केले व आरोपी राजू इंगळे  शुभम इंगळे व परसराम इंगळे यांनी फिर्यादीच्या भावास लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले अशी फिर्याद फिर्यादीने पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन  बासंबा येथे फिर्याद दिनांक 06/5/2020 रोजी दिली, त्यावरून गुर न 80/2020कलम 447 324 323 504 506 34 भां.द.वी.प्रमाणे  कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तपासी अंमलदार यांनी तपास करून विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी  हिंगोली येथे दोषारोप दाखल केला .
 विद्यमान न्यायालयात दोषारोप दाखल झाल्यानंतर RCC 233/2020 सरकार विरुद्ध  परसराम इंगळे व इतर अशी प्रस्तुत प्रकरणाची नोंदणी झाली  
त्यानंतर सरकारी पक्षाने प्रस्तुत प्रकरणात एकूण सहा साक्षीदार यांचे बयान नोंदविले त्यानंतर दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद ऐकून विद्यमान  प्रथम वर्ग न्यायालय हिंगोली मा भंडारी मॅडम  यांनी त्यानंतर सबळ पुरावे अभावी दिनांक 19/07/2025 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली, आरोपीच्या वतीने 
    अँड जी के गायकवाड पाटील यांनी  काम पाहिले  व युक्तीवाद केला. ,   
  अँड आकाश चव्हाण   अँड सुमित सातव  अँड परमेश्वर इंगोले  यांनी  सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने