जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण प्रकरणात अंतरीम जामीन अर्ज मंजूर ॲड जी. के. गायकवाड पाटील


जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण प्रकरणात अंतरीम जामीन अर्ज मंजूर ॲड जी. के. गायकवाड पाटील

विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हिंगोली यांचे आदेश
  महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
21 जुलै 2025 
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
आरोपी  विशाल डुकरे, सोपान डुकरे सतीश डुकरे मंगेश डुकरे गणेश कामखेडे सर्व राहणार आमला तालुका जिल्हा हिंगोली, गणीभाई राहणार हिंगोली ,
याच्या विरोधात दिनांक 17जुलै 2025 रोजी फिर्यादीने अशी फिर्याद दिली की आरोपी  फिर्यादी यांच्या बहिणीला त्रास देत होते म्हणून भेटण्यासाठी गेला असता सर्व आरोपी यांनी  लोखंडी रॉड काठ्या अशा हत्याराने डोक्यावर हातापायावर मारहाण केली. फिर्यादीला जखमी केले ही सदरची घटना दिनांक 12जुलै25 रोजी रात्री 9,30 वाजता आरोपीच्या गावात आमला या गावी झाली   
  अशी फिर्याद फिर्यादीने पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन  नरसी नामदेव येथे फिर्याद दिनांक 17/7/2025रोजी दिली, त्यावरून गुर न 164/2025 कलम.   109,118(1)115,352,351(2)(3),189(2)190,191,(2)(3)324(2). बी एन एस 2023.प्रमाणे  कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तपासी अंमलदार यांनी तपास करून विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब हिंगोली 
दिनाक 18/07/25 रोजी आरोपी सोपान डुकरे व विशाल डुकरे यांना अटक केली परंतु विशाल डुकरे यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालय नांदेड येथे हलवण्यात आले आरोपी सोपान डुकरे यांना विद्यमान न्यायालयात हजर केले व विद्यमान न्यायालयाने सोपान डुकरे याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले त्यानंतर दिनांक 20/7/25 रोजी आरोपी विशाल डुकरे याला विद्यमान न्यायालयात शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज येऊन रिमांडसह विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब हिंगोली यांच्या न्यायालयात रिमांडसह हजर केले परंतु आरोपी विशाल डुकरे यांचे रुग्णालयाचे व तब्येतीचे कागदपत्र बघता आरोपी विशाल डुकरे याचा अंतरिम जामीन अर्ज विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडा अधिकारी साहेब हिंगोली यांच्याकडे दाखल केला विद्यमान न्यायालयाने रुग्णालयाचे कागदपत्र व आरोपीची तब्येत बघता दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून  विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब यांनी हिंगोली आरोपी विशाल डुकरे याचा दिनांक 20जुलै2025 रोजी अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला
 आरोपीच्या वतीने जी के गायकवाड पाटील* यांनी व्यक्तिवाद केला अँड योगेश खिल्लारी अँड परमेश्वर इंगोले यांनी सहकार्य केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने