हिंगोलीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गोंधळ – 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, 08 सप्टेंबर 2025:
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे हिंगोली शहरात खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली 10 जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची माहिती:
सुरेखा एकनाथ फुपाटे, वय 43 वर्षे, व्यवसायाने शासकीय कर्मचारी, सध्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली येथे कार्यरत आहेत. त्या नेहरू नगर, रिसाला बाजार, हिंगोली येथे वास्तव्यास असून, दिनांक 08/09/2025 रोजी त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला.
घटनेचा तपशील:
दिनांक 08 सप्टेंबर रोजी दुपारी 12.05 वाजता, आरोपींनी एकत्र जमून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अनधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीस धमकावत विचारले की, “आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक का बसवला? तुम्ही आमदाराच्या सांगण्यावरून काम करता का? हुकूमशहा आहात का?" अशा प्रकारचे आरोप करत कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण केले.
यावेळी आरोपींनी कार्यालयीन कक्षात घुसून, “तुम्ही बाहेर निघू शकत नाही, तुमच्या सगळ्या बैठका गेल्या बोंबलत,” असे सांगून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची धमकीही देण्यात आली.
आरोपींची नावे संतोषराव ज्ञानबाराव टेकाळे मनिष शामराव आखरे माधव बळीराम कोरडे शामराव आनंदराव जगताप साहेबराव उत्तमराव देशमुख उत्तमराव रामाजी वाबळे परमेश्वर जयाजी मांडगे गजानन आनंदा घ्यार ववन कोंडबा नेतने रमेशराव विठ्ठलराव शिंदे सर्व आरोपी हे हिंगोली येथील रहिवासी आहेत.
गुन्हा नोंदवलेले कलम:
या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी कलम 132, 221, 356(2), 190, 351(2) भा.दं.वि. 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची पुढील कारवाई सुरू:
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा