महसूल व शासकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कारवाईची मागणी अध्यक्ष दिलीपराव कदम

महसूल व शासकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कारवाईची मागणी 
अध्यक्ष दिलीपराव कदम 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
11 सप्टेंबर 2025 
 हिंगोली महसूल विभाग व इतर शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासांविरोधात आता कर्मचारी वर्गाने आवाज उठवला आहे. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

महसूल विभागातील कर्मचारी हे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व इतर शासकीय जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत असताना, काही असमाजिक प्रवृत्तीचे लोक त्यांना त्रास देत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, कळमनुरी तहसिल कार्यालयातील महिला मंडळ अधिकाऱ्यांवर न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका पक्षकाराने अश्लील वर्तन करत मानसिक त्रास दिला. यामुळे संपूर्ण विभागाचा मनोबल खचला आहे.
तसेच जिल्ह्यातील इतर काही तलाठ्यांवर देखील शारीरिक व मानसिक हल्ल्याचे प्रकार समोर आले आहेत. याशिवाय, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून काही लोक खोट्या तक्रारी करत कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

विशेषतः, श्री. विठ्ठलराव चव्हाण, रा. उचाहा, ता. हदगाव हे इसम मागील १५ वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात वारंवार येत असून, त्यांचे कोणतेही वैयक्तिक किंवा कायदेशीर काम नसताना, केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रारी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या सततच्या उपस्थितीमुळे शासकीय कर्मचारी त्रस्त झाले असून, कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.

तरी, अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच सदर इसमास कार्यालयात येण्यास पावबंद करण्यात यावे, अशी मागणी
मध्यवर्ती संघटनेचे  अध्यक्ष दिलीपराव कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे 

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने